Tuesday 24 January 2017

बचत खाते एकच, पण ठेवा स्मार्ट...

अनेक जण बचत खाते गंभीरतेने घेत नाहीत; परंतु हे पहिले असे फायनान्शियल प्रॉडक्ट आहे, ज्याला आपण सर्वांनी प्रथम स्वीकारले आहे. हे एक असे प्रॉडक्ट आहे जे आपल्या फायनान्शियल जीवनात आपल्या सोबत राहते. आम्ही बचत खात्याचा अधिक चांगल्या प्रकार कसा उपयोग करू शकतो?

पहिले, बचत खाते आपल्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती ठेवते. आयकर नियमांचे पालन करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे जी संपत्ती आहे, ती आपल्या उत्पनाशी किती मॅच करते, हे समजणे गरजेचे आहे. जर आपण
रोकड रक्कम आयकर अधिका-यांपासून लपवू इच्छित नसाल तर बॅँक स्टेटमेंट्सचा सन्मान केला पाहिजे. दुसरे, बचत खाते हे आपली कॅश मॅनेजमेंट सिस्टिम आहे. आपण त्याचा उपयोग देणी देण्यासाठी करतो. बिल, कर, भाडे, मासिक हप्ते आणि विमा प्रीमियमची देणी देण्यासाठी बचत खात्याचा वापर होतो. पैसे कोठून येतात आणि कुठे जातात, हे तपासण्यासाठी आम्ही वेळ दिला तर आपले आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने होईल. खात्यात रोकड रक्कम पडू देणे योग्य नाही. इंटरनेट आणि मोबाइल बॅँकिंगचा वापर करून आम्ही सरपल्स रक्कमचा उपयोग दुसरीकडे सहज करू शकतो. ती रक्कम गुंतवू शकतो. कारण बचत खात्यात केवळ 4 टक्के व्याज मिळते. बचत खात्यातील रकमेचे नियोजन गंभीरतेने केल्यास आम्ही पैशांचा व्यवहार अधिक चांगला करू शकतो.

तिसरा, बचत खाते बॅँकेसह व्यवहार चांगले करण्यासाठी मदत करते. जेव्हा आपण बचत खात्याचा व्यवहार करतो, तेव्हा या व्यवहारातून आपल्या सवयी दिसून येतात. आपले उत्पन्न आणि खर्च करण्याच्या सवयींचा दस्तऐवज म्हणजे बचत खाते असते. हा दस्तऐवज बॅँकेकडे असतो. वापरानुसार खात्याच्या बॅँकेकडून आपणास विविध सुविधा मिळतात. यासाठी जास्तीत जास्त बचत खाते ठेवणे आणि बचत खात्यात व्यवहार न करणे चुकीचे आहे.

चौथा, बचत खात्याचा उपयोग गुंतवणुकीचा व्यवहार करताना सिस्टिमॅटिक ट्रान्झेक्शन करण्यासाठी करता येणे शक्य आहे. जर आपले आवश्यक खर्च 10 तारखेपर्यंतच पूर्ण होत असतील तर 15 तारखेपर्यंत सिस्टिमॅटिक बचतीचा प्लॅन तयार करता येतो. हे पैसे पीपीएफ खाते, रिकरिंग डिपॉझिट किंवा अन्य गुंतवणुकीकडे वळते करता येतात. किंवा आपणास त्या बॅँकेतील फिक्स डिपॉझिटकडे पैसे वळते करता येतात. यासाठी स्वीप फॅसिलिटी आहे. याचा वापर केला गेला पाहिजे. आपले पैसे बहुमोल आहेत, त्याचा वापर स्मार्ट पद्धतीने केला गेला पाहिजे. त्याची सुरुवात आपल्या बचत खात्यातून केली गेली तर फायदाचे आहे.